डोंबिवलीत सावरकर विचारांचा जागर

डोंबिवलीत सावरकर विचारांचा जागर
Published on

सकाळ वृत्तसेवा 
डोंबिवली, ता. १३ : डोंबिवलीत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेवर आधारित ‘केसरी ते सिंदूर’ या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आदान-प्रदान सोहळ्यात देशभक्ती आणि सांस्कृतिक मूल्यांचा सुरेख संगम शनिवारी अनुभवायला मिळाला.
 कार्यक्रमात एकलव्य आर्ट फोरम आणि श्री मुद्रा कलानिकेतन यांच्या सहकार्याने ‘अनादी मी अनंत मी’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम सादर करण्यात आला. सावरकरांच्या विचारांवर आधारित या सादरीकरणातून राष्ट्रभक्ती, स्वातंत्र्याची जाज्वल्य भावना आणि भारतीय सांस्कृतिक परंपरेचे प्रभावी चित्रण करण्यात आले.
या वेळी अलका मुतालिक, माधव जोशी आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण सभागृह सावरकरांच्या विचारांनी भारावून गेले होते. कार्यक्रमातून देशभक्तीची प्रेरणा आणि सांस्कृतिक अभिमान जागृत झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विविध सादरीकरण
कार्यक्रमाची सुरुवात एकलव्य आर्ट फोरमच्या आदान-प्रदान गीत-नृत्याने झाली. त्यानंतर ‘जय देव जय देव’, ‘जयोस्तुते’, ‘ने मजसी ने’, ‘हे हिंदू नृसिंह’ आणि ‘अनादी मी अनंत मी’ अशा विविध सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना भावविभोर केले. कार्यक्रमाची सांगता ‘ऑपरेशन सिंदूर’ या देशभक्तीपर सादरीकरणाने झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com