

येत्या काळात शेतीत आमूलाग्र बदल आणावा लागेल
कृषी सभापती वैकुंठ पाटील यांचे प्रतिपादन
पेण, ता. ४ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यातील शेतकरी अधिक विकसित होऊन तालुका पुरस्कार पुरता मर्यादित न राहता, तो राज्य पुरस्कारापर्यंत पोहोचला पाहिजे हा उद्देश ठेवून येत्या काळात शेती व्यवसायात आमूलाग्र बदल आणावा लागेल, असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे बोलताना केले.
पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन सोमवारी (ता.४) आगरी समाज हॉल येथे करण्यात आले होते. या मेळाव्याला आमदार रवींद्र पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, बाजार समिती सभापती महादेव मानकर, जि. प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कर्जतचे कृषीतज्ज्ञ डॉ. सागवेकर, पेण कृषी अधिकारी सागर वाडकर आदिंसह पंचायत समिती सदस्य तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी पेण तालुक्यातील प्रगतशील शेतकरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून अनेक शेतकऱ्यांना कृषी विषयी साहित्याचे वाटप करण्यात आले.
----------
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून पूर्वी संबोधले जायचे, परंतु आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती येत असताना शेतीची फार मोठी हानी होत चालली आहे. त्यामुळे शेती व्यवसायाकडे शेतकरीवर्ग कमी प्रमाणात वळला आहे, परंतु शेतकऱ्यांनी असे न करता शासनाच्या येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीला अधिक पसंती द्यावी, असे आवाहन या वेळी आमदार रवींद्र पाटील यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.