बालसभेत गांधी-शास्त्री विचारांचा जागर

बालसभेत गांधी-शास्त्री विचारांचा जागर
Published on: 

बालसभेत महात्मा गांधी, शास्त्री विचारांचा जागर
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बालक मंदिर संस्था प्राथमिक शाळेत विशेष बालसभा पार पडली. या बालसभेचे संपूर्ण नियोजन इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी करून आपल्या नेतृत्वगुणांचे दर्शन घडविले. प्रकाश पानसरे आणि मीनाक्षी सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ आणि ‘रघुपती राघव राजा राम’ ही भजने सादर केली. मुख्याध्यापिका कल्पना पवार यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य व अहिंसेच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले. तसेच शास्त्रीजींचा ‘जय जवान, जय किसान’ हा संदेश आचरणात आणण्याची प्रेरणा दिली.
शिक्षिका प्रतिभा मोरे यांनी गांधी व शास्त्री यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली. बालसभेचे अध्यक्षपद समर्थ जागडे याने भूषविले. मुद्रा कदम हिने सूत्रसंचालन, तर सोनित बधे याने आभार मानले. सुबोध कुलकर्णी यांनी माहिती संकलित केली. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्साहात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com