

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : विक्रीसाठी गांजा घेऊन कारमधून जाणाऱ्या अंबरनाथमधील कमरुद्दीन अब्दुल करीम शेख या ५४ वर्षीय व्यक्तीला ठाणे गुन्हे शाखेच्या घटक-१ पथकाने गोठेघर येथे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून तब्बल २४ किलो ९०७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, कारसह एकूण २२ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे गुन्हे शाखेला शेख हा कारमधून गांजा घेऊन विक्रीसाठी गोठेघर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक चित्रा चौधरी, उपनिरीक्षक सुभाष मोरे, उपनिरीक्षक दीपक जाधव यांच्यासह पथकाने गोठेघर येथील रिंगटोन बारसमोर सापळा रचून तळोजाच्या दिशेने जाणाऱ्या कार थांबवली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, वाहनाच्या मागील सीटवर काळ्या रंगाची मोठी बॅग आढळली. त्यामध्ये निळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि खाकी कागदात पॅक केलेली गांजाची १२ पाकिटे सापडली. त्यातील गांजाची अंदाजे किंमत १२ लाख ४५ हजार असून पोलिसांनी शेखच्या अंगझडतीत दोन फोन आणि चार हजारांची रोख रक्कमही जप्त केली. तसेच सुमारे १० लाखांची कार ताब्यात घेण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.