डाेंबिवलीत भटक्या श्वानाला मारहाण करून गळफास

डाेंबिवलीत भटक्या श्वानाला 
मारहाण करून गळफास
Published on: 

डाेंबिवलीत भटक्या श्वानाला
मारहाण करून गळफास

दोघा रहिवाशांसह सुरक्षा रक्षकावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : जिमखाना रोडवरील सागर्ली परिसरात भटक्या श्वानाला बेदम मारहाण करून त्याला गळफास देऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुरेश कॉम्प्लेक्स सोसायटीच्या आवारात शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी मानपाडा पाेलिस ठाण्यात दोघा रहिवाशांसह सुरक्षा रक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याप्रकरणी हिर राजपूत यांनी तक्रार दिली. त्यानुसार सुरेश कॉम्प्लेक्सच्या आवारात भटक्या श्वानाला पकडण्यात आले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून गंभीर इजा करण्यात आली. एवढ्यावर न थांबता त्याच्या गळ्यात दोरी बांधून त्याला फाशी देण्यात आल्याचा आरोप आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तक्रारीवरून सोसायटीतील रहिवासी ओमकार केंद्रे, तुषार केंद्रे यांच्यासह सुरक्षा रक्षक प्रकाश यांच्या विरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२५ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम, आणि ११(१)(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास सुरू असून, व्हायरल झालेला व्हिडिओ आणि अन्य उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या भटक्या श्वानाने परिसरातील काही नागरिकांना चावा घेतल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com