

तीन वर्षीय विधी प्रवेशासाठी आज अखेरची संधी
मुंबई, ता. ५ : राज्यात तीन वर्षीय विधीच्या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची तिसरी फेरी संपली असून, संस्थात्मक फेरी सुरू आहे. या संस्थात्मक फेरीचा मंगळवारी (ता. ६ ) अंतिम दिवस असून, राज्यातील २२४ विधी महाविद्यालयांमध्ये २३ हजार ४६८ उपलब्ध जागांपैकी आजपर्यंत (सायंकाळी ५.०० पर्यंत) १८ हजार २८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पाच हजार १८८ रिक्त जागा संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध आहेत. राज्यात तीन वर्षीय विधीच्या या अभ्यासक्रम प्रवेशासाठी ४९ हजार ८४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तिसऱ्या फेरीच्या वाटपासाठी राज्यात २२४ तीन वर्षीय विधी महाविद्यालयांत १२ हजार ७६७ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ११ हजार ७५६ विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीत विविध पसंतीक्रमांच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाची संधी होती. यापैकी ५,८८४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला. आजपर्यंत पहिल्या फेरीत ५,७६५ आणि दुसऱ्या फेरीत २,५१२ आणि तिसऱ्या फेरीत ५,८८४ असे तिन्ही फेऱ्या मिळून एकूण १४ हजार १६१ विद्यार्थ्यांनी तीन वर्षीय विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. यानंतर ३ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर २०२६दरम्यान संस्थात्मक फेरीचे प्रवेश सुरू झाले आहेत. यामध्ये आजपर्यंत ४,११९ विद्यार्थ्यांनी संस्थात्मक फेरीत प्रवेश घेतला आहे. या संस्थात्मक फेरीच्या प्रवेशाचा मंगळवारी (ता. ६) शेवटचा दिवस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.