

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : धोकादायक पोलिस वसाहतीतील कर्मचाऱ्यांना पर्यायी निवासाची सुविधा देण्यासाठी ठाणे महापालिकेने उपलब्ध करून दिली. पालिकेने दिलेल्या सदनिकांचे भाडे मोठ्या प्रमाणात थकीत राहिले आहे. वर्तकनगरमधील दोन इमारतींतील तब्बल ४९४ सदनिकांच्या भाड्यापोटी महापालिकेची तीन कोटी ३६ लाख ८६ हजारांची थकबाकी जमा झाली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी पालिकेकडून पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असतानाही थकबाकी कायम असल्याचे समोर आले आहे.
ठाणे शहरातील पोलिसांच्या जुन्या वसाहतीतील काही इमारती धोकादायक झाल्यानंतर त्या रिकाम्या करण्यात आल्या. तेथील कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून महापालिकेच्या अखत्यारीतील वर्तकनगर येथील दोस्ती रेंटल आणि आकृती रेंटर या इमारतींमध्ये सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. या सदनिकांसाठी कर्मचाऱ्यांकडून दरमहा दोन हजार रुपये भाडे आकारले जाते. मात्र, भाडे भरण्याच्या बाबतीत सर्वच सदनिकाधारकांकडून नियमितता राखली गेली नसल्याने थकबाकीचा आकडा वाढत गेला.
संबंधितांकडून थकीत भाडे वसूल करून महापालिकेकडे जमा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने स्थावर मालमत्ता विभागाने सुमारे दोन महिन्यांपूर्वी पुन्हा स्मरणपत्र पाठविले. त्यानंतरही संपूर्ण थकबाकी वसूल झालेली नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.
पोलिस विभागाकडे माहिती
उपलब्ध माहितीनुसार, एका इमारतीची थकबाकी ७८ लाख ३१ हजार ४२० रुपये, तर दुसऱ्या इमारतीची थकबाकी तब्बल दोन कोटी ५८ लाख ५५ हजार ५५७ रुपये आहे. त्यामुळे पालिकेच्या मालमत्तेतून मिळणाऱ्या भाड्याची मोठी रक्कम वर्षानुवर्षे अडकून पडली आहे. थकबाकीदार कर्मचाऱ्यांची माहिती पालिकेने पोलिस विभागाकडे यापूर्वीच पाठविली आहे.
पाठपुराव्याला वेग
या प्रकरणी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनावणे यांनी थकबाकीची माहिती खरी असल्याचे स्पष्ट केले. थकीत भाडे वसुलीसाठी पोलिस विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.