तोतया पोलिसाने वृद्धाला गंडवले

तोतया पोलिसाने वृद्धाला गंडवले
Published on: 

​उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : तोतया पोलिस बनून नागरिकांना फसवणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट वाढला असून, उल्हासनगरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. आम्ही पोलिस आहोत, या भागात साखळी चोरीच्या घटना घडत आहेत, असे सांगून भामट्यांनी हातचालाखीने एका नागरिकाची सोनसाखळी आणि दोन अंगठ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार राजेश संगतानी (वय ४८) हे आपल्या दुचाकीवरून जात असताना ५ ऑक्टोबरला रात्री ११.४० वाजताच्या सुमारास जय बाबा धाम जवळ, उल्हासनगर ५ या ठिकाणी ही घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांना थांबवले. हम पोलिसवाले है, येथे चेन स्नॅचिंग होत आहे. आज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सोने घालायचे नाही. हे दागिने कागदात ठेवून द्या, असे सांगून आरोपींनी त्यांना बोलण्यात गुंतवले. त्यानंतर हातचालाखीने त्यांच्याजवळील एक लाख ३५ हजार ते एक लाख ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी आणि दोन सोन्याच्या अंगठ्या लांबवून आरोपी पसार झाले. ​याप्रकरणी हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सहाय्यक पोलिस निरीक्षक बेंडकुळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com