पेणमध्ये देवीमूर्तींच्या सजावटीला वेग

पेणमध्ये देवीमूर्तींच्या सजावटीला वेग
Published on: 

पेणमध्ये देवीमूर्तींच्या सजावटीला वेग
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारागिरांची लगबग; अंबामाता, दुर्गा रूपांना मोठी मागणी
पेण, ता. ८ (वार्ताहर) : नवरात्रोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने पेण शहरासह तालुक्यातील मूर्ती कार्यशाळांमध्ये देवीच्या विविध रूपांतील मूर्तींना अंतिम रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे. अंबामाता, दुर्गा, भवानी आणि अंबिका या रूपांतील मूर्तींना भक्तांकडून मोठी मागणी असल्याने कारागीर दिवसरात्र कामात व्यस्त आहेत. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे.
गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून पेणची जगभरात ओळख असली, तरी येथील कार्यशाळांमध्ये देवीच्या विविध रूपांतील आकर्षक मूर्तीही साकारल्या जातात. त्यामुळे गणपतीबरोबरच देवीच्या मूर्तींनाही दरवर्षी मोठी मागणी असते. यंदा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबर रोजी सुरू होत असल्याने सार्वजनिक मंडळांकडून मूर्ती नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
पेण शहरासह हमरापूर विभागातील कार्यशाळांमध्ये अंबामाता, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, चंडिका, अंबिका, एकविरा देवी, अंबाबाई, रेणुकामाता, तुळजाभवानी, सप्तशृंगी भवानी, लक्ष्मी आणि सरस्वती अशा विविध रूपांतील मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. आठ ते दहा फुटांपर्यंतच्या मूर्तींना आकर्षक रंगसंगती, वस्त्रालंकार आणि सजावटीने नटविण्यात येत असून कारागीर अंतिम काम पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.

लोकप्रिय रूपांना पसंती
यंदा भक्तांना आकर्षक वाटणाऱ्या अंबामाता, दुर्गा, भवानी आणि अंबिका या मूर्तींना विशेष मागणी आहे. त्यामुळे संबंधित कार्यशाळांमध्ये मूर्तींचे रंगकाम, अलंकार आणि अंतिम सजावट पूर्ण करण्यासाठी कारागिरांची धावपळ सुरू आहे.
नवरात्रोत्सवासाठी यंदा अंबामाता, दुर्गा, भवानी आणि अंबिका या रूपांतील मूर्तींना विशेष मागणी आहे. त्यामुळे कार्यशाळांमध्ये अंतिम कामाला वेग आला आहे, असे मूर्तिकार तथा मूर्तिकार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अभय म्हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com