

उल्हासनगर, ता. ९ (वार्ताहर) : वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ४५ वॉर्डन, त्यांच्या मानधनावर दरमहा दोन लाख ७० हजारांचा खर्च; तरीही प्रमुख चौकांत वॉर्डन गायब आणि रस्त्यांवर कोंडी कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. या कोंडीचा कळस म्हणजे प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला रुग्णालय गाठता न आल्याने रिक्षातच बाळाला जन्म द्यावा लागल्याची घटना समोर आली आहे.
प्रसूती वेदना सुरू झालेल्या महिलेला वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत रुग्णालयात पोहोचता न आल्याने रिक्षातच प्रसूती झाल्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी नियुक्त केलेल्या ४५ वॉर्डनवर मानधनापोटी दरमहा दोन लाख ७० हजार रुपये खर्च होतात. मात्र, तरीही कोंडी कायम आहे. महापालिका मुख्यालय, शहाड रेल्वे स्थानक, श्रीराम चौक, व्हिनस चौक, नेताजी चौक, फॉरवर्ड लाईन आणि उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात वॉर्डनची नियुक्ती असतानाही ते प्रत्यक्षात दिसत नाही, असे चंदनशिव यांनी तक्रारीत म्हटले आहे. वॉर्डनवर लाखो रुपये खर्च करूनही वाहतूक व्यवस्था सुधारत नसेल तर संबंधित कंपनीचा ठेका रद्द करून दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.