

मुंबईत सामाजिक कार्यकर्त्यांची धरपकड?
दिल्लीतील देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः दिल्ली येथे १० ऑक्टोबरला होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र मुंबई पोलिसांनी सुरू केल्याचा आरोप हम सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज मिठी बोरवाला आणि सलीम साबूवाला यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप ‘हम भारत के लोग’ या संघटनेने केला आहे.
संघटनेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, २ ऑक्टोबरपासून दोन्ही कार्यकर्त्यांना अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याकडून वारंवार नोटिसा व चौकशीच्या माध्यमातून त्रास दिला जात होता, मात्र गुरुवारी दुपारी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात नेले व संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ताब्यात ठेवले व त्यांना सोडून दिल्याचे सांगण्यात आले. डाव्या आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना या प्रकारच्या नोटिसा पाठवल्याचे समजते.
दिल्लीतील सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनात विशेष मतदार यादी पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रिया रद्द करावी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागण्या करण्यात येणार आहेत. कार्यकर्त्यांच्या स्वातंत्र्य, शांततापूर्ण आंदोलन व प्रवासाच्या अधिकारांवर अशा प्रकारे निर्बंध आणू नयेत, अशी मागणी ‘हम भारत के लोग’ने केली आहे. तसेच राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, कामगार संघटना, माध्यमे आणि नागरिकांनी या कारवाईविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष तुषार गांधी, उपाध्यक्ष गुड्डी एस. एल. आणि अली भोजानी यांनी केले आहे. तसेच इतर सामाजिक संस्था, संघटनानी या घटनेचा निषेध केला आहे.
...
दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी मला तीन तास ताब्यात ठेवले होते, मात्र सामाजिक, संस्था, संघसटनांच्या दबावामुळे आम्हाला घरी जाऊ दिले.
- फिरोझ मिठीबोरवाला, सामाजिक कार्यकर्ता
-----------
लोकशाही मार्गाने विरोध करणे हा आमचा अधिकार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना अशा प्रकारे त्रास देण्याचे कुठलेच सबळ कारण मुंबई पोलिसांकडे नाही. आम्ही दिल्लीला आंदोलनासाठी जात असू तरी तो मुंबई पोलिसांचा प्रश्न नाही.
- तुषार गांधी, महात्मा गांधींचे पणतू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.