पूर्णेकर हत्याकांडातील टल्ली, पपलू प्रयागराजमधून जेरबंद

पूर्णेकर हत्याकांडातील टल्ली, पपलू प्रयागराजमधून जेरबंद
Published on: 

पूर्णेकर हत्याकांडातील टल्ली, पपलू प्रयागराजमधून जेरबंद

ठाणे, ता. ९ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी संतोष मेहिलाल कनोजिया उर्फ टल्ली (वय ४१) आणि अमित जयकिशन सिंह उर्फ पपलू (३४) यांना ठाणे गुन्हे शाखेने आज उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक केली. प्रयागराजमधील एका मंदिरातून या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.
दोघांना ठाण्यात आणण्याची प्रक्रिया सुरू असून, शनिवारी (ता. १०) त्यांना ठाण्यात आणले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या अटकेमुळे या हत्याकांडातील अटक आरोपींची संख्या पाच झाली आहे. या हत्याकांडातील आरोपी संतोष मेहिलाल कनोजिया उर्फ टल्ली फरार होता. तांत्रिक तपास आणि अन्य माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेतला. अखेर प्रयागराज येथील एका मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यासोबत अमित जयकिशन सिंह उर्फ पपलू यालाही अटक करण्यात आली. टल्ली हा ठाण्यातील मानपाडा-कापूरबावडी परिसरातील दुर्गानगर येथे राहत असल्याची माहिती आहे. हत्याकांडातील त्याचा नेमका सहभाग, अन्य आरोपींशी असलेले संबंध तसेच हत्येपूर्वी आणि हत्येनंतरच्या हालचालींचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.

हेल्मेटधारी पाचवा आरोपी पपलू
हेल्मेटधारी आरोपी अमित जयकिशन सिंह उर्फ पपलू हा भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात राहतो. तो रिक्षाचालक असल्याची माहिती आहे. हत्येच्या वेळी त्याची नेमकी भूमिका काय होती आणि अन्य आरोपींशी त्याचा कसा संपर्क होता, याचा तपास पोलिस करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com