

कल्याण, ता. २३ (वार्ताहर) : विविध मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या मागण्या व समस्या मांडण्यासाठी आझाद मैदानात येतात. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींचाही समावेश असतो. मात्र, मैदान परिसरातील पुरुष आणि महिलांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अस्वच्छता; तसेच पिण्याच्या पाण्याची अपुरी उपलब्धता यांमुळे आंदोलकांना गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासनाने आझाद मैदान परिसराची तातडीने पाहणी करून स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, पुरेशा पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी साळवे यांनी केली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना वापरण्यास सोयीची ठरणारी पाश्चात्त्य पद्धतीची स्वच्छतागृहे उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत आझाद मैदान पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.