

गिरणी कामगारांना म्हाडाचा अल्टिमेटम
कोन-पनवेलमधील घरांचा ताबा न घेतलेल्यांना ३ नोव्हेंबरपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कोन-पनवेल येथील गिरणी कामगारांच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीतील १,०८६ विजेत्यांनी अद्याप घरांचा ताबा घेतला नाही. या विजेत्यांनी २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत कागदपत्रांसह संपर्क साधावा, अन्यथा त्यांची सदनिका रद्द करून प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाईल, असा अल्टिमेटम म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०१६ मध्ये कोन-पनवेल येथे गिरणी कामगारांसाठी २४१७ घरांची लॉटरी काढण्यात आली होती, मात्र विविध कारणांमुळे १,०८६ गिरणी कामगार किंवा त्यांच्या वारसांनी अद्याप घरांचा ताबा घेतला नाही. त्यामुळे ही घरे अनेक वर्षांपासून धूळखात पडून आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई मंडळाने आता कठोर भूमिका घेतली आहे. सदर १०८६ विजेत्यांची यादी म्हाडाने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. संबंधित विजेत्यांनी २६ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत नागरिक सुविधा केंद्र, प्रवेशद्वार क्र. ४, म्हाडा मुख्यालय, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष निवेदन किंवा विनंती अर्ज कागदपत्रांसह सादर करण्याचे आवाहन म्हाडाने केले आहे.
सदनिका रद्द करणार
मुदतीत संपर्क न साधल्यास संबंधित गिरणी कामगारांना घरकुल योजनेत स्वारस्य नाही, असे गृहीत धरून त्यांची सदनिका रद्द करण्यात येईल. भविष्यात त्यांच्या कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही. त्यानंतर प्रतीक्षा यादीवरील पात्र कामगारांना घरे देण्यात येतील, असेही म्हाडाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.