विकासकाने लटकवलेल्या सदनिकेचा विजेत्याला तत्काळ ताबा

विकासकाने लटकवलेल्या सदनिकेचा विजेत्याला तत्काळ ताबा
Published on: 

विकसकाने लटकवलेल्या सदनिकेचा विजेत्याला तत्काळ ताबा
- म्हाडाच्या लोकशाही दिनात अर्जदाराला न्याय

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : म्हाडाच्या कोकण मंडळाने काढलेल्या लाॅटरीत २० टक्के योजनेतील घर ज्ञानेश्वर गरकळ यांना लागले होते. घराची किंमत भरल्यानंतरही संबंधित विकसक वाढीव शुल्क मिळावे म्हणून गरकळ यांना घराचा ताबा देण्यास टाळाटाळ करत होता. त्याबाबत गरकळ यांनी म्हाडाच्या लोकशाही दिनात अर्ज केला असता म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी अर्जदारास घराचा ताबा मिळवून देण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार गरकळ यांना आज घराचा ताबा मिळाला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे २०२१ मध्ये आयोजित २० टक्के सर्वसमावेशक योजनेच्या सोडतीत ज्ञानेश्वर गरकळ विजेते ठरले होते. त्यांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत अदा केली होती. मात्र, संबंधित विकसकाकडून पायाभूत सुविधा विकास शुल्काच्या नावाखाली वाढीव रकमेची मागणी करण्यात येत असल्याने सदनिकेचा ताबा मिळण्यात अडचण निर्माण झाली होती. परिणामी, गरकळ यांना आपल्या हक्काच्या घरासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांनी १२ ऑक्टोबरच्या लोकशाही दिनात तक्रार दाखल केली होती. याची गंभीर दखल घेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सुनावणीदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना वाढीव शुल्क आकारणीसंदर्भात आवश्यक निर्देश देण्यास सांगितले. तसेच, अर्जदाराला सदनिकेचा ताबा मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही केल्याने गरकळ यांना त्यांच्या सदनिकेचा ताबा मिळाला. त्यामुळे त्यांच्याकडून समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांच्या घरासंबंधीत समस्या सोडवण्यासाठी जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com