डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला २५ लाखांचा गंडा बनावट पोलीस अधिकाऱ्यांकडून मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन उकळली रक्कम

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला २५ लाखांचा गंडा बनावट पोलीस अधिकाऱ्यांकडून मनी लाँड्रिंग, ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन उकळली रक्कम
Published on: 

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला २५ लाखांचा गंडा
बनावट पोलिस अधिकाऱ्यांकडून मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन उकळली रक्कम
नवी मुंबई, ता. ५ (वार्ताहर) : उरण येथील एका ६५ वर्षीय निवृत्त ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत तब्बल २५ लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी आणि महिला तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उरण पोलिसांनी अज्ञात सायबर टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१३ सप्टेंबरला एका सायबर चोरट्याने सुनीलकुमार गौतम नावाचे पोलिस अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला आणि त्याच्या नावावर मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी आणि महिला तस्करीसारखे गंभीर गुन्हे असल्याचे सांगून तक्रारदारांना घाबरवले. तसेच त्यांच्या बँक खात्यांची व आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असल्याचे सांगून त्यांना कधीही अटक होईल, अशी भीती दाखवली. त्यानंतर सायबर टोळीने या तक्रारदाराच्या व्हॉट्सॲपवर गावातील मंदिर तसेच परिसरातील व्हिडिओ पाठवून त्यांच्या प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर असल्याची धमकी दिली आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तसेच बँक खात्याची पडताळणी करण्याच्या बहाण्याने २५ लाख रुपये खात्यात जमा करण्यास तक्रारदाराला सांगितले. तसेच पडताळणी पूर्ण झाल्यानंतर २४ तासांत ही रक्कम परत मिळेल, असे आश्वासन त्यांना दिले. तक्रारदाराने २३ सप्टेंबरला २५ लाख रुपये आरोपींनी दिलेल्या खात्यात वर्ग केले. मात्र, २४ तास उलटूनही रक्कम परत न आल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com