दिवाळी फराळ व्यवसायासाठी विशेष मार्गदर्शन

दिवाळी फराळ व्यवसायासाठी विशेष मार्गदर्शन
Published on: 

पुणे, ता. ८ : दिवाळीच्या पारंपरिक फराळाला व्यावसायिक स्वरूप देऊन घरबसल्या व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करणारी ‘दिवाळी फराळ व्यवसाय संधी’ कार्यशाळा १७ व १८ ऑक्टोबरला होणार आहे. घरगुती पद्धतीने चविष्ट व आकर्षक फराळ तयार करण्यासोबत त्याची विक्री करून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करावे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाणार आहे. रवा व बेसन लाडू, चकली, चिरोटे, करंजी, पुडाची वडी, शेव, बाकरवडी, विविध प्रकारचे चिवडे, शंकरपाळे आणि बालुशाही यांसह लोकप्रिय फराळाचे पदार्थ प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहेत. तसेच पदार्थांची गुणवत्ता व चव वाढवण्याच्या टिप्स, उत्पादन नियोजन, व्यवसायाची सुरुवात आणि विक्रीसाठी आवश्यक बाबी समजावून सांगितल्या जातील. तयार पदार्थांच्या सविस्तर नोट्सही देण्यात येणार असून, महिला, गृहिणी, बचत गट आणि नवउद्योजकांसाठी ही कार्यशाळा विशेष उपयुक्त ठरणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ.बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १९ व २० ऑक्टोबरला होणार आहे. घर वास्तुदोषमुक्त असावे, ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्त्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

रिअल इस्टेट मेंटॉरशिप प्रोग्रॅम
ज्या लोकांना रिअल इस्टेट क्षेत्रात कौशल्य प्राप्त करायचे आहे, ज्यांना अतिशय श्रीमंत जीवनशैली जगण्याची इच्छा व स्थिर व्यवसाय हवा आहे, अशांसाठी तीन महिन्यांचा रिअल इस्टेट मास्टरक्लास मेंटॉरशिप प्रोग्रॅम २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ‘महारेरा’ची अधिकृत प्रशिक्षण संस्था असणाऱ्या ‘एसआआयएलसी’तर्फे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रोग्रॅमसाठी शिक्षणाचे कोणतेही निकष नाहीत. करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श, असे हे प्रशिक्षण असणार आहे. रिअल इस्टेट मास्टर ट्रेनर व या क्षेत्रातील अनेक प्रकाशित पुस्तकांचे तज्ज्ञ लेखक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत. प्रशिक्षणाचे प्रतिव्यक्ती शुल्क ५०,००० रुपये अधिक जीएसटी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com