लोकार्पण सोहळ्यावरून राजकीय वाद

लोकार्पण सोहळ्यावरून राजकीय वाद
Published on: 

विरार, ता. ७ (बातमीदार) : वसई-विरार शहर महापालिकेच्या नालासोपारा-आचोळे येथील नाट्यगृह व विरार-बोळिंज येथील क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उडालेला गोंधळ आणि नियमबाह्य निमंत्रण पत्रिकेबाबत ४ ऑक्टोबरला महापौरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील सर्व खुलाशांचे विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी ५ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन जोरदार खंडन केले. महापौर आणि त्यांच्या विधानांचा या वेळी समाचार घेतला.

बहुजन विकास आघाडी  आपल्या चुका मान्य करण्याऐवजी त्याचे समर्थन करीत असून, प्रोटोकॉल आणि शासकीय नियमांची पायमल्ली करीत असल्याचा आरोप मनोज पाटील यांनी केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजप जिल्हाप्रमुख प्रज्ञा पाटील आणि गटनेते अशोक शेळके  उपस्थित होते.

 पत्रकारांशी संवाद साधताना मनोज पाटील यांनी महापौरांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. शासकीय निर्णय (जीआर) म्हणजे कायदा नाही, असे वक्तव्य करून घटनात्मक पदावर बसलेल्या महापौरांनी अराजकता माजवणारी भूमिका घेतली आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे पाटील म्हणाले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा व राजशिष्टाचाराचा मान ठेवणे ही महापालिकेची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, महापालिका आयुक्तांना अंधारात ठेवून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रोटोकॉलनुसार निमंत्रण पत्रिका मंजूर न करून घेता महापौरांनी परस्पर निमंत्रणे पाठवून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे.

अराजक कारभार खपवून घेणार नाही
महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या नियमबाह्य कारभाराविरोधात आणि लोकप्रतिनिधींच्या अवमानाविरोधात एकत्र येऊन आपला आवाज उठवला असून, इथून पुढे अशा प्रकारचा अराजक कारभार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com