Salim Khan: सलमान खानच्या वडिलांना धमकी दिली म्हणून शाहरुख खानला अटक! चित्रपटात काम मिळालं नाही म्हणून..

Arrest in Salim Khan Threat Case: सलमान खानचे वडील सलीम खान आणि त्यांच्या पीएला धमकी दिल्याप्रकरणी शाहरुख उर्फ शेरा खान या गुन्हेगाराला लखनऊ पोलिसांनी अटक केली आहे.
Salim Khan

Salim Khan

esakal

Updated on

अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा (Chhota Shakeel) गुर्गा असल्याची बतावणी करून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) आणि त्यांच्या पीएला धमकी देणाऱ्या एका शातिर गुन्हेगाराला लखनऊच्या गाजीपुर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. मो. शाहरुख उर्फ शेरा खान असे या अटक करण्यात आलेल्या कुख्यात हिस्ट्रीशीटरचे नाव असून, तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

त्याच्यावर प्रशासनाकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते. ६ मे रोजी त्याने इंदिरानगर परिसरातील इरम कॉन्व्हेंट स्कूलजवळ एका महिलेची चेन लुटली होती, तेव्हापासून पोलीस त्याच्या शोधात होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com