मुलीला १०६ ताप, पैशांसाठी घरातल्यांकडे भीक मागावी लागली... वैशाली माडेने सांगितला तो दिवस; म्हणाली- मी पूर्णपणे बदलले

Singer Vaishali Made Recalls Financial Struggles: लोकप्रिय गायिका वैशाली माडे हिने एका मुलाखतीत तिच्यावर आलेला कठीण काळ सांगितलाय जेव्हा स्वतःच्या मुलीला वाचवण्यासाठी तिला स्वतःच्याच घरात भीक मागावी लागली.
vaishali made

vaishali made

esakal

Updated on: 

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी सहन करून, वाईट प्रसंगांना तोंड देऊन पुढे आले आहेत. अनेकदा कलाकार आपल्या या काळाबद्दल मुलाखतीमध्ये बोलताना दिसतात. अशीच एक कलाकार म्हणजे लोकप्रिय गायिका वैशाली माडे. वैशालीने आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. 'सारेगमप' मधून तिला ओळख मिळाली. मात्र तिने प्रसिद्धीपूर्वी खूप वाईट काळ पाहिलाय. आता एका मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातला वाईट काळ सांगितलाय. 'अभिजात मराठी फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत वैशालीने तो काळ सांगितला जेव्हा तिच्याकडे तिच्या मुलीला हॉस्पिटलला नेण्यासाठीही पैसे नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com