Premium|Job Loss and Unemployment : नोकरी गेली आणि आयुष्य बदललं; बेरोजगारीमुळे संसारात निर्माण होणारा तणाव

Job Loss and Family Relationships : चांगला पगार, प्रतिष्ठित कंपनी आणि सुखी संसार असूनही नोकरी गेल्यानंतर आयुष्य बदलू शकते. बेरोजगारी, आर्थिक चिंता, कौटुंबिक तणाव आणि मानसिक संघर्षाचा हा अनुभव आहे.
Job Loss and Unemployment

Job Loss and Unemployment

esakal

Updated on: 

सिद्धेश सावंत - sakal.avtaran@gmail.com

एक गोष्ट सांगतो. खरी गोष्ट आहे. एकाने सांगितली होती, नाव न सांगण्याच्या अटीवर. त्याच्यासोबत घडलेली...

एक जण नोकरी करत होता. चांगल्या कंपनीत. चांगल्या पगारावर. त्या पगारामुळेच त्याने घर घेतलं होतं. गाडी घेतली होती. एसआयपी सुरू केल्या होत्या. ज्या कंपनीत तो कामाला होता, तिच्या नावामुळे त्याला कुटुंबातही चांगला मान आणि सन्मान मिळत होता.

नोकरीतली घुसमट मात्र त्या काम करणाऱ्याच्या मनात घोळत होती. एक दिवस त्याचं ऑफिसात कडाक्याचं भांडण झालं. मुद्दा कुणाचा बरोबर होता आणि कुणाचा चूक होता, यापेक्षाही मोठा परिणाम काय होता, हे तो मला सांगत होता. ऑफिसातल्या भांडणाचा त्याच्यावर इतका परिणाम झाला, की सगळे त्याला टार्गेट करू लागले. इतके, की त्याला ऑफिसातले कामाचे तासही जीवावर यायचे. घरी आल्यानंतर ऑफिसातल्या कामाची सगळी चिडचिड घरीही अप्रत्यक्षपणे बाहेर पडायची. आलेला वैताग आणि राग कुणावर काढायचा, याने त्याची मानसिक अवस्था आणखी अवघड करून ठेवली होती.

एक दिवस ज्याची भीती होती तेच झालं. कंपनीने नोकरीवरून काढून टाकलं. त्याला वाटलं, आपल्यावर अन्याय झालाय... पण कंपनीने काढून टाकण्याआधी तो स्वत:ही नोकरी सोडण्याच्या विचारात होताच. पण अनायसे, कंपनीनेच काढून टाकल्यामुळे त्याला सुरुवातीला सुटका झाल्याचा फील आलेला होता.

नोकरी गेली, त्या दिवशी घरी आल्यानंतर त्याने बायकोला जे घडलं ते सांगितलं. बायको अस्वस्थ झाली. शेवटी तिलाही संसाराचा गाडा हाकायचा होताच. नोकरीवरून काढताना पुढच्या तीन महिन्यांचा पगार मिळालेला आणि काही सेविंग्जही केलेल्या होत्या. त्यामुळे त्याला फारशी काळजी वाटत नव्हती. तीन महिन्यांत दुसरी नोकरी मिळेल, असं त्याला वाटत होतंच. तसा विश्वास त्याच्या मनात होता.

Loading content, please wait...