Premium|Madras High Court : वेगळे राहणे चूक की बरोबर?

Separate Residence and Mental Cruelty : रास्त कारणाशिवाय पत्नीने सतत स्वतंत्र राहण्याचा आग्रह धरल्याने वैवाहिक जीवन अस्थिर होत असेल, तर परिस्थितीनुसार असे वर्तन मानसिक क्रौर्य ठरू शकते, असा मद्रास उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन.
Separate Residence and Mental Cruelty

Separate Residence and Mental Cruelty

esakal

Updated on: 

ॲड. रोहित एरंडे

उच्च न्यायालयाचे खंडपीठ सांगते, की पती-पत्नीचे नाते अन्योन्य असते. विवाह टिकविण्यासाठी परस्पर सामंजस्य, प्रेम आणि सहकार्य आवश्यक आहे. कारणाशिवाय वारंवार माहेरी जाण्यामुळे पतीच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत प्रत्येक छोट्या वादानंतर पत्नी सासरचे घर सोडून जाईल अशी भीती पतीच्या मनात निर्माण होत असल्यास, ते ‘क्रौर्य’ ठरू शकते.

लग्नानंतर स्वतःचा संसार थाटून वेगळे राहणे यात आता काही नवीन राहिलेले नाही. किंबहुना लग्न ठरविताना विवाह मंडळामधील फॉर्ममध्येसुद्धा ‘लग्नानंतर वेगळे राहणार किंवा नाही’ अशा आशयाचा रकानादेखील असतो. समजून उमजून वेगळे राहणे आणि जबरदस्तीने, काहीतरी धमकी देऊन वेगळे राहण्यास भाग पाडणे या मात्र दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याचदा वेगळे राहण्याचा हट्ट हे घटस्फोट घेण्यामागचे एक कारण असल्याचे सध्या दिसून येत आहे.

पत्नीने सतत वेगळे राहण्याची मागणी करणे आणि नवऱ्याच्या आई-वडिलांपासून स्वतंत्रपणे राहण्यासाठी त्याच्या मागे लागणे हा नवऱ्याचा मानसिक छळ होऊ शकतो का? पत्नीच्या अशा वर्तनामागे कोणतेही रास्त कारण नसताना असे सातत्याने घडत असेल आणि त्यामुळे वैवाहिक जीवन अस्थिर होत असेल, तर परिस्थितीनुसार ते मानसिक क्रौर्य ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मद्रास उच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वीच्या CMA No.2942 of 2026 या निकालात मांडला आहे. या केसची पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात घेऊ.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com