

Debt Management and EMI Planning
esakal
अभिजीत कोळपकर
तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढवणं किंवा खर्च कमी करणं या दोन पर्यायांव्यतिरिक्त फारसे वास्तवात येणारे पर्याय नसतात. मानवी इच्छा अफाट आहेत. एखाद्या कर्जाची परतफेड पूर्णपणे झाली, तर नवीन ईएमआय सुरू करण्यापेक्षा गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करायला तुम्ही प्राधान्य द्यायला हवं. कर्ज घेणं ही समस्या नाही, तर बेजबाबदारपणे कर्ज घेणं आणि कर्ज काढून फालतू खर्च करणं हे तुम्हाला नक्कीच अडचणीत आणू शकतं.
यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।
चार्वाक दर्शन
या श्लोकानुसार, जोवर आपण जिवंत आहोत तोवर सुखानं जगावं. त्यासाठी कर्ज घेऊन तुपासारखा ऐषोआरामी उपभोग घ्यावा लागला तरी तो घ्यावा. कारण मृत्यूनंतर शरीर भस्म होऊन राखेत रूपांतरित होतं आणि ते परत येणं शक्यच नाही.
पण आजघडीला अशा प्रकारे निव्वळ उपभोगासाठी कर्ज घेणं यात खरोखरच शहाणपण आहे का?