Kangra Fort: हिमाचल प्रदेशमधील पहाडी किल्ला, जाणून घ्या इतिहास आणि वैशिष्ट्य

Largest Fort in himalayas: कांगडा किल्ला हा हिमाचल प्रदेशातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा आहे. त्याच्या भव्य रचनेतून प्राचीन वैभवाची झलक पाहायला मिळते.
Historic Marvel of Himachal
Majestic Kangra Fortesakal
Updated on

डॉ. मोहीत विजय रोजेकर

कांगडा किल्ल्यानं एकेकाळी निश्चितच मोठं वैभव अनुभवलेलं असणार. आज अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरूनसुद्धा जुन्या वैभवाची साक्ष पटते.

सह्याद्रीतल्या दुर्गांप्रमाणे राकट, कधी भीतीदायक, बेलाग वगैरे वाटत नसला, तरी तत्कालीन स्थानिक आणि भौगोलिक स्थान लक्षात घेता पर्यटक आणि इतिहासाच्या अभ्यासकांना तो निश्चितच भुरळ घालतो.

हिमाचल प्रदेश जसा हिमालयासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो पुरातन मंदिरं आणि किल्ल्यांसाठीसुद्धा नावाजलेला आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या, हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं जशी मनाला भुरळ घालतात, तशीच ही जुनी मंदिरं आणि किल्लेही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com