Premium|Facial Skin Care Benefits : २५ गोरी त्वचा म्हणजे निरोगी त्वचा नव्हे! फेशियलबाबतचे 'हे' ५ मोठे गैरसमज तुम्हाला माहित आहेत का?

Beauty Therapy Tips : त्वचा तजेलदार आणि निरोगी ठेवण्यासाठी फेशियल ही केवळ सौंदर्याची हौस नसून एक आवश्यक उपचारपद्धती आहे. वयाच्या पंचविशीनंतर तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियमित फेशियल केल्यास टॅन, पिगमेंटेशन आणि अकाली वृद्धत्वापासून त्वचेचे संरक्षण होऊन नैसर्गिक ग्लो टिकून राहतो.
Facial Skin Care Benefits

Facial Skin Care Benefits

esakal

Updated on

स्वप्ना साने

फेशियल करण्यासाठी कुठल्याही ओकेजनची वाट बघू नये. साधारण वयाच्या २५ वर्षांपासून सर्व महिला-पुरुषांनी फेशियल करायला हवं, कारण साधारणपणे विशीनंतर आपली त्वचा सर्व प्रकारच्या तणावाला सामोरी जात असते. टॅन, पिगमेन्टेशन, फाइन लाइन्स, क्रो फीट लाइन्स, डार्क स्पॉट्स, पिंपल्स आणि बऱ्याच प्रकारचे त्वचाविकार चेहऱ्यावर दिसायला लागतात. अशावेळेस तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दर महिन्याला तुमच्या त्वचेसाठी योग्य असणारं फेशियल करावं, सोबतच होम केअरही करावी.

फेशियल म्हटलं की सणवार, लग्नकार्य किंवा एखादं स्पेशल ओकेजन असल्यावर करावयाची सौंदर्य थेरपी, असा अनेकजणांचा समज असतो. ‘आमच्याकडे कार्यक्रम आहे, एकदम छान ग्लो येईल आणि टॅन जाईल असं फेशियल करून द्या,’ हे वाक्य अनेकवेळा ब्यूटिशियन्सना ऐकायला मिळतं. ग्लो येणारं क्रीम, पॅक लावला, टॅन कमी झालं म्हणजे फेशियल एकदम छान झालं असं बहुतांश लोकांना वाटतं.

खरंतर फेशियल म्हणजे सौंदर्यशास्त्रातील एक उपचारपद्धती आहे, जी चेहऱ्याच्या त्वचेचं डीप क्लीन्सिंग करते, मृत त्वचा एक्सफोलिएट करते म्हणजेच काढून टाकते, त्वचेला योग्य ते पोषण देऊन ऑइल आणि वॉटरचा बॅलन्स मेंटन करते. त्वचेला पोषण देण्यासाठी आवश्यक ती क्रीम्स अथवा तेलानं हळुवारपणे रिलॅक्सिंग मसाज केला जातो. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून त्वचेमधील प्रत्येक पेशीला पोषण मिळतं आणि त्वचा हेल्दी दिसू लागते. मसाज केल्यानं कोलाजेन आणि इलास्टीन बूस्ट होऊन त्वचेला लवचिकता मिळते. त्वचा तजेलदार, टवटवीत दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com