Premium|Global Economy and Fuel Hike : इराण-इस्राईल युद्ध आणि ११२ डॉलरवर गेलेले तेल! भारतीय अर्थव्यवस्थेवर याचे नेमके काय आणि किती गंभीर परिणाम होतील?

Global Economy and Fuel Hike : इराण-इस्राईल संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, खनिज तेलाचे दर ११२ डॉलरवर पोहोचल्याने भारतीय बाजारपेठेत महागाईचे सावट आहे; मात्र घसरलेल्या शेअर बाजारामुळे गुंतवणूकदारांना खरेदीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
Global Economy and Fuel Hike

Global Economy and Fuel Hike

esakal

Updated on

खनिज तेल वगळता इतर व्यापार थंडावला आहे. विमा, वाहतूक खर्चवाढ आणि कंटेनर उपलब्धतेचा प्रश्न भेडसावत आहेच, त्यात अमेरिकी आयात शुल्काचा मार यामुळे निर्यातदार जेरीस आले आहेत. निर्यात कमी झाली, तर चालू खात्याची तूट वाढेल, आयात कमी करावी लागेल.

संगीत नाटकांच्या जमान्यात अनेक नाटकांनी व कलाकारांनी रसिकांच्या हृदयावर राज्य केले. त्यापैकी संगीत गर्वहरण हे बालगंधर्व यांच्या प्रसिद्ध संगीत नाटकांपैकी एक आहे. या नाटकातील पदे बालगंधर्वांनी आपल्या अद्वितीय गाण्याने अजरामर केली आहेत. संगीत गर्वहरण हे मराठीतील एक पौराणिक नाटक आहे. पुराणात गरुड, सत्यभामा, इंद्र अशा विष्णूच्या जवळच्या अनेक व्यक्तींना जेव्हा जेव्हा अहंकार होतो, तेव्हा त्यांचा तो अहंकार विष्णू कसा नष्ट करतात या कथेवर हे नाटक आधारित आहे. त्याव्यतिरिक्त भीमाचे हनुमानाच्या भेटीनंतर झालेले गर्वहरण (वाटेतील हनुमानाची शेपटीदेखील हलवता न येणे) सर्वांना ठाऊकच आहे. तात्पर्य असे, की शेरास सव्वाशेर असतोच. हे सर्व आज आठवण्याचे कारण एकच - एका मजबूत सत्ताधाऱ्याचे इराण युद्धाच्या निमित्ताने झालेले गर्वहरण!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com