Premium|Seafloor Spreading : समुद्रतळ तयार होताना पहिल्यांदाच थेट निरीक्षण; दक्षिण हिंदी महासागरात वैज्ञानिकांचा मोठा शोध

New Oceanic Crust Formation : दक्षिण हिंदी महासागरात वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच समुद्रतळ तयार होताना थेट मोजमाप आणि निरीक्षण केले. टेक्टॉनिक प्लेट्स, मॅग्मा आणि समुद्रतळ प्रसरणाची प्रक्रिया यामुळे पृथ्वीच्या कवचनिर्मितीचे रहस्य स्पष्ट होत आहे.
Premium|Seafloor Spreading : समुद्रतळ तयार होताना पहिल्यांदाच थेट निरीक्षण; दक्षिण हिंदी महासागरात वैज्ञानिकांचा मोठा शोध
Updated on

डॉ. श्रीकांत कार्लेकर

अनेक दशके केलेल्या अभ्यासातून नवीन समुद्रतळ कसा तयार होतो, हे वैज्ञानिकांना आधीच समजले होते. मात्र समुद्रतळ प्रसरणाचे थेट निरीक्षण मिळवणे शक्य झाले नव्हते. OHA-GEODAMS ही वेधशाळा समुद्रतळावरच आहे आणि २०२७पर्यंत डेटा गोळा करत राहणार आहे. या प्रकल्पाचा व्यापक उद्देश पृथ्वी आपल्या कवचाचे नूतनीकरण कसे करते आणि समुद्रकिनारे व विविध परिसंस्था कशा तयार होतात याची माहिती मिळवणे हा आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अंदाजे दोन तृतीयांश भाग सागरी कवचाचा आहे आणि हे कवच एकाच प्रकारे निर्माण होते. महासागरातील मध्यवर्ती पर्वतरांगांवर (मिड ओशनिक माउंटन रिजेस) भू-तबके (टेक्टॉनिक प्लेट्स) एकमेकांपासून दूर सरकतात आणि ती पोकळी भरण्यासाठी मॅग्मा वर येतो. हा मॅग्मा म्हणजेच वितळलेला खडक पृथ्वीच्या अंतरंगातून वर आल्यानंतर समुद्रतळावर थंड होऊन त्यापासून नवीन कवच तयार होते. अशा प्रकारे पृथ्वीचे बाह्य कवच हळूहळू तयार होते. अशा तऱ्हेच्या प्रक्रियेची भूशास्त्रज्ञांना कल्पना असली, तरी ती प्रत्यक्षात घडताना आजपर्यंत कोणीही पाहिली नव्हती. मात्र, फ्रान्सच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका पथकाने ही घटना पाहिली आहे आणि चित्रितही केली आहे. दक्षिण हिंदी महासागरात समुद्रतळाचा विस्तार होताना नवीन समुद्रतळाची निर्मिती होत असल्याची मोठी घटना घडत आहे. या घटनेत शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच समुद्रतळाच्या निर्मितीचे थेट मोजमाप केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com