Premium|Nuclear Proliferation Crisis : अण्वस्त्रांची टांगती तलवार! अमेरिकेची इराणवरील कारवाई जागतिक शांततेसाठी की वर्चस्वासाठी?

World Peace and Geopolitics : जागतिक शांततेसाठी अण्वस्त्र नियंत्रण आवश्यक असले तरी अमेरिकेची एकतर्फी भूमिका आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे कमकुवत होणे यामुळे अराजक माजण्याची भीती आहे. संत ज्ञानेश्वरांच्या 'विश्वाचे आर्त' या संकल्पनेतून सद्यस्थितीतील संघर्षाचा घेतलेला हा तात्विक आढावा.
Nuclear Proliferation Crisis

Nuclear Proliferation Crisis

esakal

Updated on

डॉ. सदानंद मोरे

विश्वात म्हणजेच मानवजातीला शांती हवी आहे. शांती ही समृद्धीची पूर्वअट आहे. याविषयीही कोणाचे दुमत असण्याची शक्यता नाही. कारणही नाही. अण्वस्त्रसज्ज राष्ट्रांची संख्या मर्यादित ठेवल्याने अणुयुद्धाची संभाव्यता कमी होते. झाले एवढे पुरे झाले, यापुढे अधिक नको, ही भूमिकासुद्धा व्यवहाराला धरूनच आहे. तरीही प्रश्न उरतोच... अशा प्रतिबंधाचे वा प्रतिबंधात्मक कारवाईचे काम कोणी करायचे?

विश्वाचे आर्तमध्ये आपण एका अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथे हे शीर्षक अधिक स्पष्टतेची मागणी करते. योगायोगाने युद्ध छेडले गेले आहे. काय आहे अमेरिकेची भूमिका? अमेरिका इराणशी युद्ध करते आहे ते इराणचा भूभाग हडप करायचा आहे, इराणची संपत्ती लुटायची आहे म्हणून नव्हे, तर इराणपासून जगाला धोका आहे यासाठी. कसला धोका? इराणकडे युरेनियमचा लक्षणीय साठा आहे आणि तो अण्वस्त्रनिर्मितीच्या उंबरठ्यावर उभा आहे. त्याला खरोखरच हे तंत्र आत्मसात करता आले, तर त्यातून प्राप्त झालेल्या अण्वस्त्रांच्या जोरावर तो इतर राष्ट्रांना वेठीस धरू शकतो हा एक मुद्दा. दुसरा परंतु फारसा चर्चिला न जाणारा मुद्दा असा, की इराणसारखे कट्टरपंथी इस्लामी राष्ट्र या शस्त्रांचा उपयोग आपल्या धार्मिक हितसंबंधाच्या रक्षणासाठी स्वतः करू शकेल किंवा तो करू शकणाऱ्या दहशतवादी अमेरिकी संघटनांमार्फत करील, या संभाव्य धोक्यापासून एकूणच जगाचे रक्षण करण्यासाठी अमेरिका युद्धात उतरली आहे. या मुद्द्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तपासायला हवी.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com