Premium|Weight Loss : वजन कमी करण्यासाठी चालायचं की पळायचं?

Walking vs Running for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी चालणे किंवा पळणे यासोबत आहार, कॅलरी आणि शरीरातील चयापचय समजून घेणे महत्त्वाचे आहे; साखरेचे सेवन कमी करून योग्य व्यायामाची जोड दिल्यास वजन नियंत्रणास मदत होऊ शकते.
Walking vs Running for Weight Loss

Walking vs Running for Weight Loss

esakal

Updated on: 

डॉ. सुबोध देशमुख

चालणे असो वा पळणे, तुम्ही आहारात पांढरी साखर सोडली नाही तर वजन कमी होणे अशक्य आहे. साखरेमुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी सतत वाढलेली राहते आणि इन्सुलिन वाढलेले असताना शरीर साठवलेली चरबी अजिबात जाळत नाही. त्यामुळे साखरेचे पदार्थ, चहा, शीतपेये, बेकरी उत्पादने आणि पाकीटबंद पदार्थ खाणे पूर्णपणे बंद करावे.

वजन कमी करायचे ठरवले, की बहुतांश लोकांच्या डोक्यात सर्वात आधी येणारा विचार म्हणजे रोज सकाळी व्यायाम करावा लागणार. परंतु, या प्रवासात ‘रस्त्याने वेगाने चालणे जास्त फायदेशीर, की पळणे (रनिंग/जॉगिंग)’ यावरून गोंधळ पाहायला मिळतो. काही लोकांना वाटते की खूप घाम गाळून पळल्याशिवाय वजन कमी होत नाही, तर काही लोकांच्या मते रोज नियमित चालणेच आरोग्यासाठी सुरक्षित असते. प्रत्यक्षात वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत केवळ चालणे किंवा पळणे एवढाच भाग नसून त्याच्या बरोबरीने पचनक्रिया, कॅलरीज जाळण्याचे शास्त्र आणि आहाराचे गणित या गोष्टीही अत्यंत महत्त्वाच्या असतात. वजन उतरवण्यासाठी चालणे आणि पळणे यातील वैज्ञानिक फरक काय आहे आणि जलद निकालासाठी इतर कोणत्या गोष्टींची जोड द्यावी हे पुढील काही मुद्द्यांमधून समजून घेऊ या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com