Premium|Suvarnabhumi : भारत आणि सुवर्णभूमी...भौतिक देवाणघेवाण

Ancient India and Southeast Asia Gold Trade : आग्नेय आशियाला सुवर्णभूमी म्हणण्यामागे मुबलक सोन्याची उपलब्धता होती; नदीच्या वाळू आणि डोंगरमातीमधून मिळणाऱ्या सोन्याची माहिती भारतीयांना होती आणि त्यांनी व्यापारातून त्याचा लाभ घेतला.
Suvarnabhumi

Suvarnabhumi

esakal

Updated on: 

डॉ. पुलिंद सामंत - sakal.avtaran@gmail.com

आग्नेय आशियाला भारतीयांनी ‘सुवर्णभूमी’ का म्हटले असावे? या नावामागे केवळ सोन्याचे आकर्षण नव्हते; तर व्यापार, शेती, अन्नपदार्थ, कापड आणि जीवनशैली अशा अनेक क्षेत्रांत भारत अन् आग्नेय आशिया यांच्यात शतकानुशतके देवाणघेवाण सुरू होती.

या परस्पर संबंधांनी दोन्ही प्रदेशांच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनावर खोल ठसा उमटवला.भारतीयांचे आग्नेय-आशियात स्थलांतर क्वचित काळी राजकीय अंगाने, उदाहरणार्थ कलिंग-युद्धोत्तर काळात आश्रय घेण्याच्या उद्देशाने झाले असले तरी प्रथमतः आणि प्रामुख्याने ते भौतिक भरभराटीच्या उद्देशाने झाले यात शंका नाही. चौथ्या शतकात रोमन साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर पश्चिम दिशेला होत असलेल्या भारतीय व्यापार-व्यवहारात घट झाली आणि तदनुषंगिक वाढ पूर्व दिशेला पुढील काळात झाली, असे इतिहासकारांचे सर्वसाधारण मत आहे. सदर घट/वाढ झाल्याचे अनुमान योग्य असले तरी भारतीयांनी त्याआधी काही शतके (उदा. सम्राट अशोक काळात) आग्नेय आशियाला ‘सुवर्णभूमी’ हे नामाभिधान का दिले असावे, याचा विचार करणे भाग आहे. याचे सरळ उत्तर असे, की सदर भूभागात सहजी आणि मुबलक प्रमाणात सोने सापडत होते. खाण-शोधन-विकसन तंत्रज्ञान उपलब्ध नसताना, नदीकाठ/पात्रातील वाळू जमा करून आणि डोंगरमाती खणून त्यात सापडणारे सोने आग्नेय आशियात उपलब्ध होते, जे भारतीयांना उर्वरित जगाच्या आधी ज्ञात होते आणि त्या ज्ञानाचा वापर त्यांनी स्व-लाभासाठी पुरेपूर करून घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com