Premium|Global Economic Transition 2026 : जग मंदीच्या उंबरठ्यावर की नव्या आर्थिक क्रांतीच्या? कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या अर्थव्यवस्थेचे काय होणार?

World Crisis and War : कोरोनानंतरचे जागतिक अस्थिरतेचे सावट, भीषण युद्धसंकट आणि कर्जाचा डोंगर यामुळे संपूर्ण जग सध्या एका निर्णायक संक्रमण काळातून जात आहे. डी-डॉलरायझेशन आणि ऊर्जा संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची पुनर्रचना होण्याचे संकेत मिळत असून नवी आव्हाने उभी ठाकली आहेत.
Global Economic Transition 2026

Global Economic Transition 2026

esakal

Updated on

मुकुंद मराठे - shrimms123@gmail.com

कोरोना महासाथीपासून सुरू झालेल्या जागतिक अस्थिरतेला युद्धसंकट, वाढते कर्ज आणि तेलधक्क्यांची जोड मिळत असून, जग एका निर्णायक संक्रमण टप्प्यात प्रवेश करत आहे. बदलत्या आर्थिक व्यवस्थेत डी-डॉलरायझेशन, ऊर्जा संकट आणि हवामान बदलाचे आव्हान यांचा प्रभाव वाढत असताना, भविष्यातील जागतिक संतुलन कसे असेल, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पूर्ण जग सध्या एका संक्रमणकाळातून जात आहे, असे म्हणावे लागेल. हे आजपासून नाही, तर गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या दशकात २०२० मध्ये मानवी जगावर कोरोना महासाथीचे संकट ओढवले, तर २०२३ मध्ये इस्राईलवर हमासने भीषण हल्ला केला, त्यानंतर रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले आणि आता अमेरिका-इस्त्राईल-इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. या दशकातील या प्रमुख घटना मानता येतील. त्यापैकी कोरोनाविषयी आपल्याला बरीच माहिती आहे. या संकटामुळे जगावर कर्जाचा प्रचंड बोजा वाढला, अर्थव्यवस्थांचे मोठे नुकसान झाले आणि सर्वत्र अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले. दुसऱ्या घटनेने सध्याच्या संघर्षाची पायाभरणी केली. दोन पारंपरिक शत्रू देश युद्धाला सामोरे गेले आणि त्यात महासत्ताही ओढल्या गेल्या. आजच्या घडीला पाहिले, तर आखाती संघर्षामुळे तेलसंकट निर्माण झाले आहे. कच्च्या तेलाची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जगावर आणखी आर्थिक ताण पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण ‘एआय’ युगाकडे वाटचाल करत आहोत; परंतु त्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज भासणार आहे. त्याचवेळी जगाला पाणीटंचाई, त्सुनामी, भूकंप, अनियमित पाऊस, प्रदूषण आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com