Missing Girl
sakal
लोणी काळभोर - लोणी काळभोर येथील एमआयटी महाविद्यालयात बीबीएच्या तृतीय वर्षात शिक्षण घेणारी २० वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी घरातून निघालेली सृष्टी मोहन येळे ही अद्याप घरी परतलेली नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने तिच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.