

चारा टंचाईच्या उंबरठ्यावर अहिल्यानगर जिल्हा
- दोन महिन्यानंतर परिस्थिती गंभीर होणार शक्यता
- अहिल्यानगरला चार तालुक्यात चाराच नाही
- दुष्काळी पट्ट्यातील तालुक्यात स्थिती गंभीर
- विक्रीसाठीही चारा नसल्याने अडचणीत भर
सूर्यकंत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : जुलै महिन्याचा अपवाद वगळता यंदा पाऊस झाला नाही. त्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडील माहितीनुसार जिल्ह्यातील अहिल्यानगर, जामखेड, पाथर्डी व पारनेर या चार तालुक्यातील उपलब्ध चारा संपला आहे.
संगमनेर तालुक्यात केवळ एका महिन्याचा चारा उपलब्ध आहे. राहिलेल्या नऊ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात ४ महिने, दोन तालुक्यात पाच महिने तर एका तालुक्यात तीन महिने व एका तालुक्यात सहा महिने पुरेसा एवढा चारा आहे. सरासरी दोन महिन्याला लागतो तेवढा चारा सध्या आहे. रब्बीची पेरणी नसल्याने जिल्ह्यात दोन महिन्यानंतर गंभीर चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता दिसतेय.
अहिल्यानगर जिल्ह्यात १३ लाख १९ हजार ९०६ मोठी तर १ लाख ७९ हजार ९८७ लहान असे जवळपास पंधरा लाख गाय व म्हैस वर्गातील जनावरे आहेत. या शिवाय सव्वा अकरा लाखाच्या आसपास शेळ्या-मेंढ्या आहेत.
पशुसंवर्धन विभाग नव्याने सर्वेक्षण करून जनावरे, गाई-म्हशी, शेळ्यामेंढ्यांसह अन्य जनावरांची व शेतकऱ्यांकडे उपलब्ध चाऱ्याची माहिती संकलित करत आहे. आत्तापर्यंत १ लाख ६७ हजार शेतकऱ्यांकडील माहितीची नोंदी झाल्या आहेत. दरवर्षी खरिपातील पिके, चारा पिके, डोंगर, माळराळ, चराई क्षेत्र आदीच्या माध्यमातून तसेच रब्बी पिके, चारा पिके, मुरघास आदीमधून उपलब्ध चाऱ्याच्या माहितीचे संकलन केले जाते.
पशुसंवर्धन विभागानुसार जिल्ह्यात दररोज ३ लाख टन चारा लागतो. ऑक्टोबर अखेर जिल्ह्यात सरासरीनुसार २४ लाख ३५ हजार ५४६ टन चारा शिल्लक आहे. सर्व तालुक्याची ही सरासरी असली तरी दुष्काळी पट्ट्यातील अहिल्यानगर, जामखेड, पाथर्डी व पारनेर या चार तालुक्यातील उपलब्ध चारा संपला आहे.
संगमनेर तालुक्यात केवळ एका महिन्याचा चारा उपलब्ध आहे. अकोले, कर्जत, कोपरगाव, शेवगाव व श्रीगोंदा तालुक्यात चार महिने, राहुरी, राहाता तालुक्यात पाच महिने, नेवाशात तीन महिने तर श्रीरामपुरात सहा महिने पुरेल एवढा चारा आहे.
----------
पशुधन, उपलब्ध चारा व चारा लागण्याची स्थिती
तालुका................जनावरांची संख्या......महिन्याला लागणारा चारा.....उपलब्ध चारा (टन)
अहिल्यानगर ......... २,१४,६४६ ............... ७६,१५६ ............ ०
अकोले .......... १,६०,८८५ ............... ५७,९५५ ...............२,०६,७७४
जामखेड ..............९४,३३२................३३,९८७ ................०
कर्जत ........... १,८०,००१ ............. ५९.६८९ ...............२,२७,९१७
कोपरगाव........ १,०४,४५१ .......... ४१,७७६ .................१,७८,९७०
नेवासा ............. २,१४,६४६ ............. ७६,१५६ .......... २,६४,९७७
पारनेर ........... २,५२,५५१.......... ७९,३७२....................०
पाथर्डी ..............२,१०,९१०...............६३,०२५....................०
राहाता ..............१,२०,३९१.................४७,६५४ ............२,३२,२६९
राहुरी .............२,५३,२४०.....................८६,४८०............४,६५,४९७
संगमनेर ........ ३,०२,८३०.......... १,०९,४०२.............१,११,६३२
शेवगाव ............. १,३०,८४८ ............... ४२,२४८ .......... १७२,९९१
श्रीगोंदा...............२,२८,५३६..............७५,८८५.................३,१७,५७४
श्रीरामपुर..............१,१६,८३१...........४२,५७०...........२,५०,९३५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.