

The Pune Municipal Corporation has launched the 'Sevawari' initiative to enhance services and public participation during the Ashadhi Wari.
Sakal
पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महापालिकेने यंदा प्रथमच ‘सेवावारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. वारकऱ्यांची सेवा, वारीच्या परंपरेचे जतन आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छता, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच १० जुलै रोजी रात्री ९ वाजता शहरात एकाच वेळी लाखो वारकरी, नागरिक पसायदान म्हणणार आहेत, अशी माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.