

The new Air Ambulance facility aims to ensure faster emergency medical transport for Warkaris requiring advanced treatment.
Sakal
पुणे : आषाढी वारीत पंढरपुरात वारकऱ्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जागोजागी रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स तैनात असतात. मात्र, जर एखाद्या वारकऱ्याला उच्च उपचारांची गरज पडली व त्यांना तातडीने पुणे, मुंबई सारख्या शहरात हलविण्याची गरज पडल्यास राज्याच्या आरोग्य विभागाकडून यावर्षी प्रथमच हवाई रुग्णवाहिका (एअर ॲम्बुलन्स)ची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.