Rana Bull
sakal
पारगाव - उत्तर पुणे जिल्ह्यात विशेषतः आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये बैलगाडा शर्यतींची मोठी लोकप्रियता आहे. आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथील शर्यतीच्या जातिवंत खिल्लार जातीच्या ‘राणा’ बैलाला तब्बल १७ लाख ११ हजार रुपयांची विक्रमी किंमत मिळाली आहे. या व्यवहारामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात बैलगाडा प्रेमींमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.