Pune News: बायफला जागतिक व्यासपीठावर संधी:शाश्वत शेती आणि नवीकरणीय ऊर्जेचे मॉडेल(सीओपी३१)मध्ये मांडले.

BYAF at COP31 : तुर्कीतील जागतिक हवामान परिषदेत बायफने शाश्वत शेती, नवीकरणीय ऊर्जा आणि हवामान अनुकूल ग्रामीण विकासाचे मॉडेल सादर केले. उपक्रमांचा १८ राज्यांतील ५० लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ झाला आहे.
 BYAF delegation members Dr. Manojkumar Aware, Dr. Dinesh Raturi and Mahesh Lade with UNFCCC senior officer Vikrant Badve at Antalya.

BYAF delegation members Dr. Manojkumar Aware, Dr. Dinesh Raturi and Mahesh Lade with UNFCCC senior officer Vikrant Badve at Antalya.

esakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन,: हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी ग्रामीण भारतात गेली सहा दशके सुरू असलेल्या कामाचा जागतिक स्तरावर आढावा घेण्याची संधी उरुळी कांचन स्थित बायफ विकास संशोधन प्रतिष्ठानला मिळाली आहे.संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल विषयक आराखडा कराराअंतर्गत (युएनएफसीसीसी) मान्यताप्राप्त संस्था म्हणून बायफ तुर्की येथील अंटालिया शहरात ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या ३१ व्या जागतिक हवामान परिषदेत(सीओपी३१)सहभागी होत १३ नोव्हेंबरला आपले संशोधन सादर केले.

Loading content, please wait...