

पुणे - गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी चार बेस आणि चार टॉपची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिस प्रशासन आणि मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत एकमत झाले आहे. एकही बेस किंवा टॉप वाढविल्यास मंडळावर थेट गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरालाही पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे.