CBSE SSC Result Declare : सीबीएसईचे दहावीचे ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

देशातील २७ हजार ३३९ शाळांमधील २४ लाख ८३ हजार ४७९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
CBSE exam Result
CBSE exam Resultesakal
Updated on

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा एकूण विद्यार्थ्यांपैकी ९३.७० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीबीएसईच्या दहावीच्या निकालात ०.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशभरातील लाखो विद्यार्थी मंगळवारपासूनच सीबीएसईचा दहावी निकाल जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत होते. दरम्यान, हा निकाल बुधवारी दुपारी जाहीर करण्यात आला. अर्थात, सीबीएसईने कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे निकाल जाहीर करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com