

पुणे - पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांतील ग्रामपंचायतींमधील ६२३ कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यावरून समाविष्ट गावातील सर्वपक्षीय नगरसेवक सभागृहात आक्रमक झाले. तणावामध्ये काही जणांनी आत्महत्या केली आहे, अजून किती जणांनी जीव द्यावा अशा शब्दात सामान्य प्रशासन विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्यावर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन सभागृहात दिले.