

Pune encroachment crime
पुणे - महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईत आज शहरातील नामांकित हॉटेल आणि चौपाट्यांना लक्ष्य करण्यात आले. तरुणांचे कट्टे बनलेल्या हॉटेलांमधील अतिक्रमणांवरही प्रशासनाने हातोडा चालविला. फ्रंट मार्जिन, साइड मार्जिन आणि रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात सलग सहाव्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेत तब्बल दोन लाख पाच हजार ८०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.
विशेष म्हणजे, या कारवाईचा दणका काही नगरसेवकांनाही बसला आहे. आतापर्यंत सहा दिवसांत सहा लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.