Pune News : मुख्यमंत्री पुण्यात तरीही सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाचे उद्‍घाटन नाहीच

पुणे महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटर दरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम सप्टेंबर २०२२ मध्ये सुरु केले आहे.
sinhgad road flyover
sinhgad road flyoversakal
Updated on

पुणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यात सलग दोन दिवस कार्यक्रम आहेत. असे असतानाही सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाबाबत महापालिकेला मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ देण्यात आलेल नसल्याने हा कार्यक्रम लांबणीवर पडला.

आता एक मे रोजी हा उद्‍घाटनाचा कार्यक्रम होण्‍याची शक्यता असल्याचे महापालिका प्रशासनातर्फे सांगितले जात आहे. पण या सर्व घडामोडीत पुणेकर भर उन्हात वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com