

PNE26W60762
सोलापूर : येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात कार्यक्रम सादर करताना कलावंत.
---
सुरेल भीम अन् धम्मगीतांनी
रंगला ‘धम्म पहाट’ कार्यक्रम
पारमिता फाउंडेशनच्या वतीने आयोजन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : पारमिता फाउंडेशनच्या वतीने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात भीम व धम्मगीतांचा ‘धम्म पहाट’ कार्यक्रम रंगला. या वेळी सादर झालेल्या भीमगीतांना आणि बुद्धगीतांना श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
राज्य राखीव पोलिस गट क्रमांक एकच्या समादेशक डॉ. दीपाली काळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. भंते सुमेधजी नागसेन यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदेसना दिली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोलापुरात प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संयोजक सुधीर चंदनशिवे आणि प्रा. डॉ. वनिता चंदनशिवे यांच्या हस्ते पाहुणे व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. अंजना गायकवाड यांनी निवेदन केले, तर प्रा. शंकर खळसोडे यांनी संगीत संयोजन केले.
कार्यक्रमात सुनीता गायकवाड, राजगंधर्व सदाफुले, वर्षा सोनवले, सुप्रिया माने, सुनंदा शेंडगे आणि रमेश माळशिकारे यांनी भीम व बुद्धगीते सादर केली. महेश कांबळे, यश वाघमारे, राजकुमार सावळगी आणि अभिषेक दनाने यांनी वाद्यवृंदाची साथ दिली. प्रा. डॉ. वनिता चंदनशिवे यांनी आभार मानले. कार्यक्रमास योगीराज वाघमारे, प्रा. डॉ. एम. डी. शिंदे, अनिल विपत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.