

जिल्हा बॅंक निडणुकीत यंत्रणा
निःपक्षपणे काम करत नाही
नीलेश लंके, सदाशिव लोखंडे यांचा आरोप; ‘गोकुळ’सारख्या पॅटर्नची आशा
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः जिल्हा बॅंकेच्या निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांनी निःपक्षपणे काम केले पाहिजे. मात्र निवडणूक यंत्रणेबाबत आमचा आक्षेप आहे. ही यंत्रणा निःपक्षपणे काम करत नाही. अर्ज काढण्याची अंतिम मुदत बुधवारी (ता. २१) दुपारी तीन वाजेपर्यंत होती. मात्र अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत अर्ज मागे घेतले. आम्ही सीसीटीव्हीची मागणी केली असून अधिकारी म्हणतात सीसीटीव्ही बंद आहेत. कॅंमेरे का बंद आहेत, याचा अर्थ अधिकाऱ्याचा हेतू चांगला नाही, असा आरोप खासदार नीलेश लंके, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी केला.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ११ संचालक बिनविरोध झाले. यात काही उमेदवारांना गाठून अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत अर्ज मागे घेतल्याचे सांगत गुरुवारी (ता. २२) पत्रकारांशी बोलताना निवडणूक प्रक्रियेतील यंत्रणेवर आरोप केले. या वेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे जालिंदर वाकचौरे यांच्या पदाधिकारी उपस्थित होते.
लंके म्हणाले, की सरकारी अधिकारी जेव्हा पदावरील खुर्चीवर असतात, तेव्हा त्यांनी पक्ष, संघटना न पाहता काम केले पाहिजे. त्याची भूमिका प्रत्येकांबाबत योग्य असली पाहिजे. मात्र येथील अधिकारी तसे न करता कोणासाठी तरी काम करत आहेत. अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीनला संपली, मात्र अधिकारी कोणाचे तरी एकूण उमेदवारांचे अर्ज मागे घेत होते. त्यामुळे आमचा या यंत्रणेवरच आक्षेप आहे. आता मतदान केंद्रावर तसेच तालुक्यातून मतपेट्या घेऊन येणाऱ्या गाडीत तसेच मतपेट्या जेथे ठेवल्या जातील तेथे कॅमेरे आणि आमचा एक प्रतिनिधी ठेवावा, अशी आम्ही मागणी करणार आहोत. कारण येथे काहीही होऊ शकते. जिल्हा बॅंक शेतकऱ्यांची आहे. शेतकरी आणि कारखानदारांना मदत करते. मात्र ही बॅंक ठिकली पाहिजे, शेतकरी वाचला तर कारखानदार वाचेल, त्यामुळे आधी शेतकरी वाचला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. मात्र आपल्या बगलबच्यांना सोबत घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. दाखवायचे दात एक, खायचे दात एक हे सगळ्या जिल्ह्याने पाहिले आहे, असा टोला लंके यांनी मारला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत कोल्हापूरसारखा अहिल्यानगर पॅटर्न होईल, असा आशावादही लंके यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.