Diwali Firecrackers
sakal
पुणे - दिवाळीचा सण सुरक्षित आणि आनंदात साजरा व्हावा, यासाठी महापालिकेच्या अग्निशामक दलाने फटाके फोडणे आणि त्यांच्या साठवणुकीबाबत नागरिकांसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. सणादरम्यान आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशामक दलातील सर्व अधिकारी आणि जवानांच्या सुट्या आणि रजा रद्द केल्या असून, संपूर्ण दल सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी दिली.