pune traffic jam
sakal
पुणे - दिवाळीच्या खरेदीसाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यांसह प्रमुख मार्गांवर शनिवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहनांची संख्या वाढल्याने रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यातच नो-एंट्रीतून होणारी वाहतूक, दुहेरी पार्किंग तसेच नो-पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने यामुळे कोंडीत आणखी भर पडत असल्याचे चित्र दिसून आले.