पुण्यातील डॉ. सतीश पाटील यांचे ‘मितीबेस’ स्टार्टअप

एखाद्या व्यक्ती, व्यवसाय आणि कंपनीचे कामकाज वाढवायचे असेल, तर त्यासाठी नेटवर्किंग महत्त्वाचे असते.
Dr. Satish Patil
Dr. Satish PatilSakal
Updated on
Summary

एखाद्या व्यक्ती, व्यवसाय आणि कंपनीचे कामकाज वाढवायचे असेल, तर त्यासाठी नेटवर्किंग महत्त्वाचे असते.

पुणे - एखाद्या व्यक्ती, व्यवसाय आणि कंपनीचे कामकाज वाढवायचे असेल, तर त्यासाठी नेटवर्किंग महत्त्वाचे असते. त्यातून ग्राहक, विक्रेते आणि नागरिकांच्या संबंधांविषयी माहिती मिळते. ती लक्षात घेऊन त्याचा व्यवसायाला फायदा करण्याची प्रक्रिया मोठी वेळखाऊ असते. हीच अडचण सोपी करण्याचे काम पुण्यातील एक स्टार्टअप करीत आहे.

कंपन्या व कंपनी नोंदणीच्या वेबसाइट, समभागधारकांची यादी, वार्षिक वित्त विवरणे, सोशल मीडिया इत्यादी सार्वजनिक स्तरावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या स्रोतांमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती असते. पण, ही सगळी माहिती विस्कळीत आणि गुंतागुंतीची असते. ही माहिती विचारपूर्वक जोडलेली नसते, त्यामुळे तिचा सहजपणे वापर करता येत नाही. माहिती मोठ्याप्रमाणातही असू शकते व ती सतत उपलब्ध होण्याचा वेगही जास्त असतो, त्यामुळे या माहितीचे सुसूत्रीकरण करून ती वापरात कशी आणायची हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचे उत्तर पुण्यातील ‘मितीबेस टेक्नॉलॉजीज्’ने (Mitibase Technologies) शोधून काढले आहे. ऑटोमेटेड रिलेशनशिप इंटेलिजन्ससह सर्व ॲप्लिकेशन आणि टूल्सला पॉवर करण्यासाठी हे स्टार्टअप डेटा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करते.

थोडक्यात, मितीबेस, एआय व मशिन लर्निंगचा वापर करून या सगळ्या डेटाचे हे स्टार्टअप मायनिंग करते व तो एकत्रित करते. एआय अल्गोरिदम प्रचंड प्रमाणातील डेटाची गणना करतात आणि त्यातील बारकावे व इंटेलिजन्स काढण्यासाठी लोक, कंपन्या आणि संस्थांमधील परस्परसंबंधांचे रिव्हर्स इंजिनिअरिंग करतात. पुण्यातील डॉ. सतीश पाटील यांनी या स्टार्टअपची २०१९मध्ये स्थापना केली आहे. जागतिक पातळीवरील ग्राहकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व मशिन लर्निंगचा वापर करून उत्पादने व सोल्यूशन्स उभारण्याचा व डिलिव्हर करण्याचा दहापेक्षा जास्त वर्षांचा त्यांना अनुभव आहे. सतीश यांनी अमेरिकेतील मिनिसोटा विद्यापीठातून पीएचडी, तर मुंबई विद्यापीठातून बी.टेक. पदवी संपादन केली आहे.

नवे ग्राहक, गुंतवणूकदार जोण्यात मदत...

‘जगासमोर रिलेशनशिप इंटेलिजन्स आणणे हा आमचा उद्देश आहे. कोणत्याही संधीची सुरुवात ही रिलेशनशिप म्हणजेच नात्यापासून होते. आपले नेटवर्क प्रचंड संधींनी भरलेले आहे. परंतु, यापैकी बहुतेक संधी आपल्याला माहिती नसतात आणि यामुळे आपण त्यांचा फायदा करून घेऊ शकत नाही. अवतीभवती असलेल्या उत्पन्नाच्या संधी ज्यांच्याविषयी आपण अनभिज्ञ असतो, त्या आपण शोधल्या पाहिजेत. तुम्ही कोणाला ओळखता, तुमच्या कोण संपर्कात आहे, तुमच्या नेटवर्कमध्ये अजून व्यक्तींना जोडण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. आपले नेटवर्क ही आपली मालमत्ताच आहे ज्यात तुम्ही कायमची गुंतवणूक करत असता. मितीबेस टेक्नॉलॉजीज कंपन्यांना त्यांच्या कंपनीच्या सामूहिक नेटवर्कमध्ये खोलवर लपलेल्या मोठ्या कमाईच्या संधी शोधण्यात, व्यवस्थापित करण्यात आणि नवे ग्राहक व गुंतवणूकदार जोडण्यात मदत करते,’ असे मितीबेस टेक्नॉलॉजीज प्रा. लि.चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश पाटील यांनी सांगितले.

वैशिष्ट्ये...

  • एआय-आधारित रिलेशनशिप इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म

  • रिलेशनशिप डेटाची रचना करण्यासाठी मितीबेस हा डेटा ईमेल व कॅलेंडरशी जोडते

  • त्यातून नेटवर्कबद्दल कोणत्याही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात

  • इंटेलिजंट एनएलपी, एनएलयू आणि ग्राफ मशिन लर्निंग अल्गोरिदम सार्वजनिक डेटा स्रोतांवरील हजारो डेटा पॉइंट्सची मोजणी करत तत्काळ माहिती पुरवते

  • मितीबेस रिलेशनशिप डेटा केंद्रित करते

  • डेटा नीट रचून, त्याचा संदर्भ लावून व जाणून घेऊन मितीबेस टेक्नॉलॉजीज कंपन्यांसाठी विक्री व महसूल वाढविण्यास मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com