

PNE26W55672
सोलापूर : विधायक उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा सन्मान करताना पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील. यावेळी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी व अन्य अधिकारी.
---------------
गणेशोत्सव मंडळांचा पोलिस आयुक्तांकडून सन्मान
सार्वजनिक, लोकमान्य, लष्कर, पूर्व विभाग, घरकुल मध्यवर्तीमधील मंडळांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : गणेशोत्सवात समाजोपयोगी उपक्रम राबवून डीजेमुक्त उत्सव साजरा करणाऱ्या मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळांचा मंगळवारी (ता. ६) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात सार्वजनिक, लोकमान्य, लष्कर, पूर्व विभाग, घरकुल मध्यवर्ती मंडळातील मंडळांचाही समावेश आहे.
सार्वजनिक मध्यवर्ती मंडळातील मानाचा टिळक गणपती मंडळाने रक्तदान, आरोग्य शिबिर राबविले. वृक्षारोपण, गणेश जन्मोत्सव कार्यक्रम, महाप्रसाद, जखमी जनावरांवर उपचार केले. पशुपतिनाथ दर्शन देखावा सादर केला. लोकमान्य मंडळातील लोकसेवा तरुण मंडळाने वृक्षारोपण, नशामुक्तीवर पथनाट्य, भजन, कीर्तन, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शिबिर, दिव्यांगांना मदत, डीजेमुक्त मिरवणूक काढली. ‘लष्कर’मधील जय तिरुपती क्रीडा सेवा मंडळाने महिलांसाठी आरोग्य शिबिर, गर्भवतींसाठी विशेष शिबिर, रेशनकार्ड, आधारकार्ड शिबिर, घरेलू महिला कामगारांसाठी उपक्रम राबविले. पूर्व विभाग मध्यवर्तीतील एकतानगर गणेश मंडळ, घरकुल मध्यवर्तीमधील सिद्धरामेश्वर क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ, नीलमनगर मध्यवर्तीमधील विघ्नेश्वर मित्र मंडळ, विजापूर नाका मध्यवर्तीमधील चौडेश्वरी गणेशोत्सव मंडळ, होटगी रोड मध्यवर्तीमधील भैरवनाथ गणेश उत्सव मंडळ, बाळे येथील खडक गल्ली गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विजापूर नाका मध्यवर्तीमधील पंचमुखी हनुमान गणेशोत्सव मंडळ, सुखकर्ता गणपती तरुण मंडळ, जुळे सोलापुरातील मोरया प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचाही पोलिस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
---------------
चौकट
समीक्षक समितीचे ‘हे’ सदस्य
पर्यावरणपूरक गणेशोत्सव, सामाजिक उपक्रम, विधायक काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या नोंदी घेण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने समीक्षक समिती नेमली होती. यात डॉ. मनोज देवकर, शैलेश अहिवले, डॉ. रामचंद्र हुंडारे, तुकाराम चाबुकस्वार, मेघा कांबळे, गीतांजली यादव, अमोल कुलकर्णी यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.