

ईद-ए-मिलादनिमित्त बुधवारी भव्य मिरवणूक
सामाजिक उपक्रमांची रेलचेल; रक्तदान, नेत्रतपासणी, अन्नदानासह विविध कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २१ ः जगाला शांती व समतेचा संदेश देणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती बुधवारी (ता. २६) भव्य मिरवणूक व विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कमिटीच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता विजापूर बस स्थानक येथून जुलूस काढण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त एम. राजकुमार, शहर काझी अमजदअली आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून मिरवणुकीस सुरवात होईल. बेगम पेठ पोलिस चौकी, किडवाई चौक, सोशल हायस्कूल, मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशाह मदार चौक, जेलरोड पोलिस ठाणे, भारतीय चौक, बाराईमाम चौक, समाचार चौक, मधला मारुती मार्गे विजापूर वेशीत मिरवणुकीची सांगता होईल.
यानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. हिजामा कॅम्प, रक्तदान शिबिर, नेत्रतपासणी, खतना कॅम्प, वृक्षारोपण, धान्य वाटप, अन्नदान, तसेच अनाथ मुलांना फळे व वह्यांचे वाटप करण्यात येणार आहे. गरजू महिलांना साड्यांचे वाटप व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धाही होणार आहेत.
आसार मैदान येथे कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मोहल्ला व वाहन सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, तीन विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत.
पत्रकार परिषदेस माजी महापौर आरिफ शेख, शकील मौलवी, कादर भागानगरे, मतीन बागवान, सईद नाईकवाडी, राजू कुरेशी, राजू हुंडेकरी, समीर शेख, अखलाख दिना, अशपाक बागवान आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.