

‘एफडीए’ पथकाच्या धास्तीने
व्यावसायिकांचे शटर डाऊन
टाकळीभान, ता. २२ ः तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली भेसळखोरांवर कारवाई सुरू असताना टाकळीभान (ता.श्रीरामपूर) परिसरात अन्न व औषध प्रशासन पथकाने छापा मारल्याची बातमी वाऱ्या सारखी पसरल्याने टाकळीभान बाजारपेठेतील बहुसंख्य व्यावसायिकांनी दुकानाचे बंद ठेवणे पसंत केले.
गुरुवारी (ता.२०) सायंकाळी सातच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाचे पथक गावात आल्याची बातमी बाजारपेठेत पसरली. यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची धांदल उडाली. पथक दुकानामधील विविध खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करून कारवाई करतील या भीतीने आपापली दुकाने बंद करत निघून जाणे व्यावसायिकांनी पसंत केले. पथकाची बातमी सर्वत्र पसरल्याने नागरिकांमध्येही या पथकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. संबंधित पथकाला बघण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेतील विविध चौकामध्ये गर्दी केली होती. अन्नसुरक्षा व भेसळ प्रतिबंधक नियम, तपासणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे आणि तपासणीची प्रक्रिया याबाबत व्यावसायिकांना पुरेशी माहिती नसल्याने, तसेच कारवाई होईल या भीतीने व्यावसायिकांनी दुकान बंद केले. मात्र, पथकाने ज्या ठिकाणी भेट दिली ते बाजारपेठेपासून दूर असल्याने, तसेच संपर्क साधला असता अधिकृत तपशील न मिळाल्याने तपासणीचा उद्देश नेमका काय? याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, या प्रकारामुळे व्यावसायिकांची चांगलीच धांदल उडाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.